Wednesday, September 9, 2026
Homeदेसाईगंजअवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.. -ओबीसी काँग्रेसचे...

अवकाळी पावसाने बळीराजा संकटात; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.. -ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-अवकाळी पावसाने देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या धान पिकाला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे.याचा सर्वाधिक फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.अनेकांनी कापलेले धान सुकवण्यासाठी शेतात ठेवले होते,काही ठिकाणी कापणीचे काम सुरू होते; मात्र,अचानक झालेल्या मुसळधार पावसाने हे सर्व धान भिजून गेले.शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान आता मातीमोल होत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे,दिवाळी संपताच शेतकऱ्यांनी हलक्या धानकापणीला सुरुवात केली होती.शेतकऱ्यांनी दिवाळी कशीबशी साजरी केली आणि लगेच धानकापणी करून आलेला धान बाजारपेठेत विकून उधार,उसनवारी फेडण्याच्या तयारीत असतांनाच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.देसाईगंज तालुक्यातील धानपिकावर खोडकिडा,करपा,मावा तुडतुडा या कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यातून शेतकरी कसाबसा सावरला असतांनाच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी; यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशीही मागणी मनोज ढोरे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!