Wednesday, September 9, 2026
Homeमुंबईग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण भागातून सातत्याने होणाऱ्या मागण्या आणि स्थानिक विकासाची वाढती गरज लक्षात घेता राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेत ग्रामपंचायतींच्या निधीत वाढ केली आहे.त्यानुसार, जनसुविधा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी मिळणाऱ्या विशेष अनुदान योजनेतील कामांची व्याप्ती व्यापक करीत त्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प, क्रीडांगण विकास,वाचनालय यांसारख्या नवीन पाच कामांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.सरकारच्या या नवीन निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायतींना आपल्या गावाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून ग्रामीण भागातील सार्वजनिक सोयी-सुविधांचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.नव्या निर्णयानुसार,समाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक नवीन कामासाठी स्वतंत्र खर्चाची मर्यादा आखून देण्यात आली आहे.यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी सर्वाधिक २० लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.तसेच गावांमध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच गावातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल्स ग्रामीण भागातील वाचनालय इमारत बसवण्यासाठी २० लाख रुपये,विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी बांधकामासाठी २० लाख रुपये,आणि ग्रामीण भागातील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडांगणाचा विकास करण्यासाठी २० लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. याशिवाय,गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचा निधी खर्च करता येईल.दरम्यान,शासकीय निधीचा अपव्यय टळवा आणि या कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी,यासाठी सरकारने एक कठोर नियमावली तयार केली आहे.या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे अन्य कोणत्याही शासकीय किंवा स्थानिक योजनेमधून पुन्हा प्रस्तावित करता येणार नाहीत वा ती दुसऱ्यांदा घेता येणार नाहीत,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!