Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरचक्क टोल कर्मचाऱ्याच्या अंगावरच चालकाने घातली गाडी..

चक्क टोल कर्मचाऱ्याच्या अंगावरच चालकाने घातली गाडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-टोल कर्मचाऱ्याने कार चालकाकडून टोल मागितला असता,चक्क चालकाने कर्मचाऱ्याच्या अंगावरच गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशाह येथील विसापूर टोल नाक्यावर रात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आला.कारचालक इथेच थांबला नाही तर,त्याने टोल कर्मचाऱ्याला काही मीटर अंतरावर फरफटत देखील नेले.यात २७ वर्षीय संजय अरुण वांढरे गंभीर जखमी झाला आहे.संजय वांढरे हा विसापूर टोल नाक्यावर संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होता.घटनेनंतर बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.वाहन चालक बेपत्ता असला तरीही सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.शनिवारच्या रात्री १ वाजताच्या सुमारास बल्लारशाहहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका टाटा एस कारने टोल टाळण्यासाठी लाईन ओलांडली. यादरम्यान,टोल कर्मचाऱ्याने चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले.तेव्हा त्याने गाडी न थांबवता उलट कर्मचाऱ्याला चिरडून गाडी भरधाव पुढे नेली.यात टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला.त्यानंतर त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.पोलिसांत तक्रार दाखल होताच कार चालकाचा शोध घेतला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!