Sunday, May 31, 2026
Homeचंद्रपूरजमिनीचे बनावट कागदपत्र सादर करून उचलले एक लाखाचे कर्ज…-सरपंच आणि आदिवासी कार्यकारी...

जमिनीचे बनावट कागदपत्र सादर करून उचलले एक लाखाचे कर्ज…-सरपंच आणि आदिवासी कार्यकारी संस्थेच्या व्यवस्थापकाचा प्रताप; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

राजुरा(चंद्रपूर):-शेतकऱ्याच्या जमिनीचे बनावट कागदपत्र सादर करून सरपंच आणि आदिवासी कार्यकारी संस्थेच्या व्यवस्थापकानेच १ लाख ८ हजार ५८७ रूपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार काल,शुक्रवारी सोंडो येथे उघडकीस आला.न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.मात्र आरोपी फरार झाले आहेत.सरंपच जयपाल आत्राम, शाखा व्यवस्थापक जगन दुर्गे अशी आरोपींची नावे आहेत.दरम्यान,पीडित शेतकरी विठ्ठल मेश्राम यांनी  पत्रकार परिषद घेऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी विठ्ठल मेश्राम यांची १० एकर शेती आहे. सरपंच जयपाल आत्राम देवाडा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे शाखा व्यवस्थापक जगन दुर्गे यांनी शेतकरी मेश्राम यांची सहमती न घेता मधुकर मेश्राम तसेच प्रभाकर मेश्राम यांच्या नावाने एकूण एक लाख ८ हजार ५८७ रूपयांचे कर्ज घेतले. दरम्यान,मधुकर मेश्राम व प्रभाकर मेश्राम या दोघांचाही मृत्यू झाला.मात्र सातबाऱ्यावर मालकी हक्क विठ्ठल मेश्राम यांची असल्याने मृतकांच्या नावाच्या कर्जाचा भरणा करण्यासाठी सोसायटीने नोटीस बजावली.त्यानंतर मेश्राम यांनी कोर्टात धाव घेतली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!