Monday, August 31, 2026
Homeनागपूरपूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांपैकी गडचिरोलीत मधुमेहाचे व उच्च रक्तदाबाचे रुग्ण अधिक…

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांपैकी गडचिरोलीत मधुमेहाचे व उच्च रक्तदाबाचे रुग्ण अधिक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- उपसंचालक आरोग्य विभागाच्या वतीने मागील पाच वर्षांत राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालावरून धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे.पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांपैकी गडचिरोलीत मधुमेहाचे व हायपरटेन्शनचे रुग्ण अधिक आढळून आले.या शिवाय भंडाऱ्यात मुखाचा कर्करोग तर वर्धेत स्तनाचा कर्करोग वाढत असल्याचे दिसून आले.पूर्वी संसर्गजन्य आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण मोठे होते. लसीकरण व जनजागृतीमुळे हे आजार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आले.मात्र आता असंसर्गजन्य आजार (एनसीडी) विशेषतः मधुमेह,हृदयविकार, रक्तदाब,पक्षाघात व कर्करोगांचे प्रमाण वाढत चालले आहे.याला घेऊनच राज्यात ऑगस्ट २०११ पासून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०२० ते मार्च २०२४ या कालावधीत पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया,नागपूर व वर्धा या सहा जिल्ह्यात ३० वर्षांवरील लोकांची तपासणी करण्यात आली.यात मधुमेह,उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन), मुखाचा कर्करोग,स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोगाचा रुग्णांची नोंद घेण्यात आली.

गडचिरोलीत मधुमेहाचे ९४,३४९ रुग्ण👇

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात नोंद झालेल्या एकूण मधुमेहांपैकी सर्वाधिक ९४ हजार ३४९ रुग्ण एकट्या गडचिरोलीत आढळून आले. त्या खालोखाल भंडाऱ्यात ४७ हजार ८३१, चंद्रपूरमध्ये ४३ हजार १४६, नागपुरात २९ हजार ४७६, गोंदियात २७ हजार ९२०, तर वर्धेत १९ हजार २१७ रुग्णांची नोंद झाली.

उच्च रक्तदाबाचेही सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीत👇

उच्चरक्तदाबाचे गडचिरोलीमध्ये १ लाख ७२ हजार ५३४ रुग्णांची नोंद झाली. इतर पाच जिल्ह्याच्या तुलनेत ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या शिवाय, भंडाऱ्यात १ लाख ४९ हजार ५६८, वर्धेत १ लाख ४४ हजार ५२६, चंद्रपूरमध्ये १ लाख १९ हजार १३३, गोंदियात ९४ हजार १३८, तर सर्वात कमी ७१ हजार ८६८ रुग्ण नागपूर ग्रामीणमध्ये आढळून आले.

ओरल कॅन्सरमध्ये भंडारा पुढे👇

भंडाऱ्यात ओरल कॅन्सरचे म्हणजे मुखाचा कर्करोगाचे ४६८ रुग्ण आढळून आले. चंद्रपूरमध्ये ३५४, गडचिरोलीत ३३४, गोंदियात २७१, वर्धेत १७८ तर नागपूर ग्रामीणमध्ये १७८ रुग्णांची नोंद झाली.

वर्धेत स्तनाच्या कर्करोगाचा विळखा👇

वर्धेत स्तनाचा कर्करोगाचे सर्वाधिक २८४ रुग्ण आढळून आले.या शिवाय,भंडाऱ्यात २६४,चंद्रपूरमध्ये १८७,गडचिरोलीत १६७,गोंदियात १६१ तर नागपूर ग्रामीणमध्ये केवळ २४ रुग्णांची नोंद झाली. गर्भशयाचा कर्करोगाचे सर्वाधिक १६२ रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळून आले.वर्धेत १३४, भंडाऱ्यात १३०, गोंदियात ११३, चंद्रपूरमध्ये ९६, तर नागपुरात ३५ रुग्णांची नोंद झाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!