Wednesday, October 21, 2026
Homeचंद्रपूरदेशी कट्टे अन् जिवंत काडतुसे कशासाठी? वाढती गुन्हेगारी.. - दोघेजण अटकेत..

देशी कट्टे अन् जिवंत काडतुसे कशासाठी? वाढती गुन्हेगारी.. – दोघेजण अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र आहे.तलवार,बंदूक,हत्या व इतर अपराधिक सीमा ओलांडल्या जात आहेत.पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.मात्र,काहीजण सुधरण्याचे नावच घेत नाही. अश्याच प्रकारे नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर शहरात दोन देशी कट्टे व दोन जिवंत काडतुसे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी जप्त केली आहेत.प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.३९ वर्षीय राहुल दिनेश डंगोरे रा.पंडित दीनदयाळ वॉर्ड, बल्लारपूर व ३० वर्षीय ईस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख रा.रेल्वे नगर वॉर्ड,बल्लारपूर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.या दोघांवर बल्लारपूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जुनी पेपर मिल कॉलनी परिसरात सापळा रचून अवैधरित्या देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या राहुल डंगोरे याला अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचा लोखंडी कट्टा जप्त करण्यात आला.तर दुसऱ्या कारवाईत रेल्वे नगर वॉर्ड येथील नवाब शेख हा आपल्या घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून असल्याच्या माहितीवरून बल्लारपूर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीचे ७ एमएम बोर असलेले अग्निशस्त्र व दोन पितळी धातूचे दोन काडतूस जप्त करून ईस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख यास अटक केली.पहिली कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार,बलराम झाडोकार, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर,किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे,किशोर वाकाटे,शेखर माथनकर,प्रमोद डंभारे,रिषभ बारसिंगे आदींनी केली.तर दुसरी कारवाई पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे,शब्बीर पठाण,रणविजय ठाकूर,सुनील कामतकर,पुरुषोत्तम चिकाटे,सत्यवान कोटनाके,संतोष दंडेकर आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज...

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!