Sunday, June 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांना रकमेची मर्यादा नाही,तर सातबाराच होणार कोरा..

आता कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांना रकमेची मर्यादा नाही,तर सातबाराच होणार कोरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून राज्य सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे.महाराष्ट्र राज्यातील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असल्याचे सांगितले जात आहे.या सर्व पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली समिती एप्रिल महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करेल.
यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही,अशी महत्त्वाची माहिती आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये दीड ते दोन लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते.मात्र,आता या नवीन निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.आता कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांना रकमेची मर्यादा नाही,तर सातबाराच कोरा होणार आहे.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे.सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागविण्यात आली आहे.प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने २०१७ मध्ये दीड लाखांची आणि २०१९ मध्ये दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले.पण,सध्याच्या स्थितीत राज्यातील २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे बँकांची जवळपास ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी आहे.या पार्श्वभूमीवर आता थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा उताराच कोरा केला जाणार आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-भरधाव वेगात असलेली अनियंत्रित वॅगनर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरच्या मागील बाजूस जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील...

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी शहरातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात एका ६५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, रविवार २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस...

सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना पोकरा योजनेतून पंप संचावर ९० टक्के तर पीव्हीसी पाइप संचावर १०० टक्के अनुदान.. – शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील निवड झालेल्या ५३२ गावांतील अनुसूचित जाती(SC)व अनुसूचित जमाती (ST)प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प(पोकरा)अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी...

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!