Monday, September 28, 2026
Homeगडचिरोलीसिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना पोकरा योजनेतून पंप संचावर ९० टक्के...

सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना पोकरा योजनेतून पंप संचावर ९० टक्के तर पीव्हीसी पाइप संचावर १०० टक्के अनुदान.. – शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील निवड झालेल्या ५३२ गावांतील अनुसूचित जाती(SC)व अनुसूचित जमाती (ST)प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प(पोकरा)अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत पंप संचावर ९० टक्के अनुदान तसेच पीव्हीसी पाइप संचावर १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून,पात्र शेतकऱ्यांनी महापोकरा पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील पोकरा प्रकल्पांतर्गत निवडलेल्या ५३२ गावांमधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.सिंचनाची सुविधा अधिक सक्षम करून शेती उत्पादनात वाढ करणे,जलसंधारणाला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पंप संचावर ९० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.तसेच शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेल्या पीव्हीसी पाइप संचावर १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
  • पात्रता व अटी👇
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा गडचिरोली जिल्ह्यातील पोकरा प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या ५३२ गावांपैकी एका गावाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.तसेच तो अनुसूचित जाती(SC)किंवा अनुसूचित जमाती(ST)प्रवर्गातील शेतकरी असावा. याशिवाय सिंचनासाठी विहीर,बोअरवेल,नदी-नाला किंवा ओढा यांसारखे पाण्याचे उपलब्ध स्रोत असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया👇
पात्र शेतकऱ्यांनी शासनाच्या महापोकरा पोर्टल (dbt.mahapocra.gov.in)वर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.तसेच सीएससी(कॉमन सर्व्हिस सेंटर) मार्फतही अर्ज भरता येणार आहेत.
  • अधिक माहितीसाठी संपर्क👇
योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय,गडचिरोली किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अनुदान शासनाच्या प्रचलित नियम व अटींनुसार देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन सिंचन सुविधा मजबूत कराव्यात आणि शेती उत्पादन वाढीसाठी शासनाच्या या विशेष उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!