Tuesday, September 29, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ७७ हजार ६६६ चिमुकल्यांना पोलिओचा डोस..

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ७७ हजार ६६६ चिमुकल्यांना पोलिओचा डोस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
​गडचिरोली :-जिल्ह्यात आज रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील तब्बल ७७ हजार ६६६ चिमुकल्यांना पोलिओचा डोस पाजण्यात आला असून,जिल्ह्याचे ९२.५३ टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
पल्स पोलिओ मोहीम: एका दृष्टिक्षेपात आकडेवारी👇
​एकूण अपेक्षित लाभार्थी (उद्दिष्ट): ८२ हजार ९८४ बालके
पोलिओ डोस दिलेले प्रत्यक्ष लाभार्थी:
 ७६ हजार ७८९ बालके(० ते ५ वयोगटातील ),५ वर्षावरील- ८७७ असे एकूण- ७७ हजार ६६६ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.
​सुटलेल्या बालकांसाठी घरोघरी मोहीम(IPPI)👇
जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.माधव शिंदे यांनी माहिती देतांना सांगितले की,बूथवरील मोहिमेच्या दिवशी जे लाभार्थी कोणत्याही कारणास्तव पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहिले आहेत; त्यांच्यासाठी आता ‘आयपीपीआय’ (IPPI) टीममार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.
​सुटलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना डोस देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून त्याची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
​ शहरी भागात: सलग ५ दिवस घरोघरी सर्वेक्षण
 ग्रामीण भागात: सलग ३ दिवस घरोघरी सर्वेक्षण
आरोग्य विभागाच्या टीम घरोघरी जाऊन ‘एकही मूल सुटता कामा नये’ या उद्देशाने लसीकरण पूर्ण करतील.
​लसीकरणासोबतच ‘ताप रुग्ण सर्वेक्षण’ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती देतांना स्पष्ट केले की,घरोघरी जाणाऱ्या या पथकांमार्फत केवळ पोलिओ लसीकरणच केले जाणार नाही,तर या सर्वेक्षणादरम्यान ‘ताप रुग्ण सर्वेक्षण’ देखील केले जाणार आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
  • ​ नागरिकांना आवाहन👇
आरोग्य विभागाच्या वतीने सर्व पालकांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,पोलिओ लसीकरण आणि ताप सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओचा डोस नक्की पाजा आणि देशाच्या पोलिओमुक्तीच्या लढ्यात आपले योगदान द्या.
 ​”दोन थेंब जिंदगीचे… पोलिओला हरवूया,देशाला जिंकवूया!”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी देसाईगंज तालुक्यात ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’.. – आज जुनी वडसा येथे विशेष शिबिराचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पुरवठा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देसाईगंज तालुक्यात सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’ सुरू करण्यात आले आहे.देसाईगंज तहसील कार्यालयाच्या तहसीलदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!