Wednesday, September 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल ९० लाख ८५ हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १ हजार ८१७ कोटीची रक्कम जमा झाल्याचे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी म्हटले.शनिवार २० जून रोजी
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भरणे कार्यक्रमात सहभागी झाले होते.केंद्राने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना सुरू केली आहे.अश्यातच पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालच्या हुगळीतील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला.पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दोन हजार रुपये प्रमाणे थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होते. खात्यात २३ वा हप्ता थेट जमा झाल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्यात पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत २२ हप्त्यांद्वारे ४१ हजार ८३ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!