Sunday, September 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसंबंधीच्या नियमांत बदल केले आहेत.त्यानुसार, चालू ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे बंधनकारक केले आहे.ज्या ग्राहकांनी आधारप्रमाणीकरण केलेले नाही,अशा सिलिंडरधारकांची जोडणी रद्द करण्यात येणार आहे. ग्राहकांना संबंधित गॅस एजन्सी किंवा कंपन्यांच्या ॲपद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
इंडेन,एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांनी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल,तर त्यांना सबसिडी मिळण्यात अडथळा येईल आणि त्यांचे गॅस कनेक्शनही काही दिवसांसाठी बंद केले जाऊ शकते.अधिकृत मोबाइल ॲपच्या मदतीने फेस-ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकेल.त्याचबरोबर,चालू ऑगस्ट महिन्यापासून पासून घरपोच गॅस सिलेंडर डिलिव्हरीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.आता ग्राहकांद्वारे सिलिंडर बुकिंग केल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक वन-टाइम पासवर्ड पाठवला जाईल. पासवर्डचा हा संदेश डिलिव्हरी बॉयला दाखवणे अनिवार्य आहे.गॅसचा पुरवठा कुठे-कुठे करण्यात आला,याची अपडेट एजन्सी व कंपन्यांना द्यावी लागणार आहे.ज्या गॅसधारक ग्राहकांनी अद्यापही ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही; अशांनी तात्काळ   ई-केवायसी करून घ्यावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!