- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात चीमुकल्यांवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार,महाराष्ट्र राज्यात बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असून दररोज सरासरी आठ चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार(बलात्कार)होत असल्याचे गुन्हे नोंदवले जातात.कठोरात-कठोर कायदा अंमलात असला तरीही काहींची विकृत मानसिकता बदलण्याचे नाव घेत नाही. अश्याच प्रकारे तब्बल दीड वर्षांपूर्वी अवघ्या चार वर्षाच्या चीमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाल अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती जे.ए.मोहंती यांनी आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.पांडुरंग सोमना कळ्ळी वय ४६ वर्षे, रा.करजगी,ता.जत,जि.सांगली असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित चिमुकली ही आपल्या आजी-आजोबाकडे राहत होती.घटनेच्या दिवशी म्हणजेच २ फेब्रुवारी २०२५ रोजी पिडीत चिमुकली तिच्या ८ वर्षीय चुलत बहिणीसोबत सकाळच्या सुमारास खेळत होती.खेळता-खेळता दोघी थोड्यावेळाने आरोपी पांडुरंग याच्या घरासमोरील झाडाखाली बदाम खाण्यासाठी गेल्या.दरम्यान, चिमुकलीच्या चुलत बहिणीला तिच्या आईने शाळेत जाण्यासाठी आवाज दिल्याने चुलत बहिण घराकडे गेली.त्याचवेळेस,आरोपी पांडुरंग याने एकटीच असलेल्या चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला व निर्घृण खून करून मृतदेह एका पिशवीत भरून घरातील लोखंडी पेटीत ठेवला.बराच वेळ होऊनही नातीन दिसत नसल्याने आजीने शोधाशोध सुरू केली.बराच वेळ शोधूनही नातीन सापडत नसल्याने उमदी पोलिसांना माहिती देण्यात आली.त्यानंतर,एपीआय संदीप कांबळे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.चौकशी सुरू असतांनाच काहींनी आरोपी पांडुरंग याच्याबरोबर चिमुकलीला पाहिल्याचे पोलिसांना सांगितले.पांडुरंग याच्या घरात शोध घेतला असता लोखंडी पेटीत चिमुकलीचा मृतदेह आढळला.त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपी पांडुरंग याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात हत्या व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.घटना उघडकीस येताच संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.आरोपीला कठोर फाशीची शिक्षा व्हावी,यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मोर्चे आणि आंदोलने केली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या पंधरा दिवसांत न्यायालयात चार्जशीट (दोषारोपपत्र)दाखल केले होते.त्यानुसार,पांडुरंग सोमना कळ्ळी या नराधमाला सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाने दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
- Advertisement -

