Thursday, August 6, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी आदेश काढून देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांची देसाईगंज येथून कुरखेडा येथे,तर स्वप्निल इज्जपवार यांची देसाईगंज येथे बदली करण्यात आली आहे.स्वप्निल इज्जपवार हे जिल्हा पोलीस मुख्यालयात उपअधीक्षक पदावर कार्यरत होते.तर आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास गवते यांची आरमोरी येथून धानोरा येथे,तर इंटरसेल अहेरीचे सचिन झनक यांची आरमोरी येथे नियुक्ती करण्यात आली आहे.तर महेंद्र वाघ यांची कुरखेडावरुन आष्टी येथे,दीपक डोंब याची चामोर्शीहून कोरची येथे,तर नियंत्रण कक्षातील महादेव ढाकणे यांची चामोर्शी, सुनील बागल यांची मुलचेरा येथे,इंटरसेल गडचिरोलीचे बाबासाहेब दुधाळ यांची सिरोंचा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.तर गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांना गडचिरोली पोलीस ठाण्यात कायम ठेवण्यात आले आहे. काही कालावधीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी जिल्ह्याची धुरा सांभाळली,तेव्हापासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या,अश्यातच आता जुन्या-नव्या अधिकाऱ्यांना नव्या ठाण्यांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने अवैध धंदे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!