- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर २० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून एकट्या देसाईगंज तालुक्यात ९३ मिमी पाऊस कोसळला.त्यातच, जिल्ह्यातून सर्वात जास्त पावसाची नोंद ही देसाईगंज तालुक्याच्या शंकरपुर परिसरात झाली असून शंकरपुर महसूल मंडळात ११५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.त्याचबरोबर,जिल्ह्यातील बारा तालुक्यापैकी सरासरी कोसळलेल्या पावसाच्या नोंदीत देसाईगंज तालुका पहिल्या क्रमांकावर असून येथे ९३ मिमी पाऊस, धानोरा ८५ मिमी,आरमोरी ७७.८ मिमी,कुरखेडा ७१.१ मिमी, कोरची ६१.८ मिमी,गडचिरोली ५७.१ मिमी, एटापल्ली ४७.५ मिमी,चामोर्शी ३५.७ मिमी,मुलचेरा २५.३ मिमी,भामरागड २२.८ मिमी,अहेरी २१.४ मिमी तर सिरोंचा तालुक्यात १९.१ मिमी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
- सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली २० महसूल मंडळे👇
- शंकरपुर(ता.देसाईगंज)-११५
- धानोरा- ९७.०
- कोरची –९१.६
- मुरुमगाव(ता.धानोरा)-९०.२
- कढोली (ता.कुरखेडा)-८२.६
- मसेली (ता.कोरची)-८२.०
- चातगाव(ता.धानोरा)-८०.२
- वैरागड(ता.आरमोरी)-८०.०
- पोटेगाव(ता.गडचिरोली)-७८.१
- आरमोरी –७८.०
- देऊळगाव(ता.आरमोरी)-७८.०
- कोटगुल(ता.कोरची)- ७६.४
- पिसेवडधा(ता.आरमोरी)-७५.०
- बेळगाव(ता.कोरची)- ७३.४
- पेंढरी(ता.धानोरा)-७२.४
- देसाईगंज- ७१.०
- मालेवाडा(ता.कुरखेडा)-७०.३
- बाम्हणी(ता.गडचिरोली)-७०.०
- कुरखेडा –६६.३
- पुराडा(ता.कुरखेडा)-६५.२
- Advertisement -

