Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी मैदानात उडी घेतल्याचे चित्र आहे.त्यानुसार,वंचित बहुजन आघाडीने उद्या,गुरुवार २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे.वंचितचे प्रमुख ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.त्यांनी राज्यातील सर्व समविचारी पक्ष,विद्यार्थी संघटना आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा द्यावा,असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.शांततेच्या मार्गाने हक्क मागण्या करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे.पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • विरोधी पक्षातील नेत्यांची उडी👇
काल मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलनास बसले होते; तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर पोहचून आंदोलकांशी चर्चा करत त्यांच्याकडून माहिती घेतली आणि अभिजीत दिपके यांच्याशी चर्चा करत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवर चिंता व्यक्त केली.त्यातच,आज बुधवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली आणि सरकारवर टीकेची तोफ डागली.आपण पाहिलं की ज्या क्रूरपणे सरकारने विद्यार्थ्यांना वागणूक दिली आहे,हे काही लोकशाहीचं लक्षण नाही.या सरकारपेक्षा ब्रिटिश चांगले होते असं का म्हणत आहेत लोक? कारण जे सत्तेत आहेत त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे.जनतेला ही हवा बरोबर काढता येते,असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.अश्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात उडी मारल्याने जिकडून-तिकडून सरकारची कोंडी निर्माण झाली आहे. यावर सरकार काय भूमिका घेते,हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!