Thursday, July 23, 2026
Homeदेसाईगंजमहाराष्ट्र बंदला विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक संघटनांचा उत्सफुर्त प्रतिसाद . - शेकडो मोर्चेकऱ्यांच्या...

महाराष्ट्र बंदला विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक संघटनांचा उत्सफुर्त प्रतिसाद . – शेकडो मोर्चेकऱ्यांच्या उपस्थितित राष्ट्रपतींना निवेदन सादर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आज,गुरुवार २३ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.या हाकेला उत्सफुर्त प्रतिसाद देत विद्यार्थी,विविध सामाजिक संघटना,वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी, समता सैनिक दल यांनी शेकडोंच्या उपस्थितित दिल्लीच्या जंतर-मंतर येथील आंदोलनाचे समर्थन करुन जुलमी सरकारचा निषेध करत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर गेल्या २५ दिवसांपासुन निट पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारने सकारात्मक भुमिका घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,तसेच पेपर फुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपये सहाययता निधी घोषित करावी,या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.मात्र,केंद्र सरकारने मागण्यांवर पुर्ण:ता दुर्लक्ष करुन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.ही अमानुष घटना घडत असतांना एका विद्यार्थिनीला जिव गमवावा लागला.याचे तिव्र पडताद आता महाराष्ट्रात उमटले आहेत.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत देसाईगंजच्या विविध सामाजिक संघटनांनी घडलेल्या घटनेचा तिव्र निषेध नोंदविण्यासाठी देसाईगंजच्या फव्वारा चौकातुन निषेध मार्च काढुन देशाचे राष्ट्रपती यांना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा,या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांचे मार्फतीने सादर करण्यात आले.या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम,बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष भास्कर मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते विजय बन्सोड,हंसराज लांडगे,प्रा.अशोक मेश्राम,आशिश घुटके, कृणाल लांडगे,पवन गेडाम,समता सैनिक दलाचे साजन मेश्राम,तबरेज खान,प्रकाश सांगोळे,इम्रान शेख,ममता जांभुळकर,आशा दहिवले,मिना शेन्डे,विनोद मेश्राम,बाबा पडवेकर,श्यामला राऊत यांचेसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बारदाना निर्मिती उद्योगाचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ स्वयंरोजगारापुरते मर्यादित न राहता शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणाऱ्या रोजगार क्लस्टरच्या माध्यमातून व्हावे.त्याचबरोबर जिल्ह्यात विकसित...

उद्याला देसाईगंज नगरीत आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी न्यायाची मागणी करत दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला अमानुष लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर झालेला...

आता स्मार्ट मीटरची तक्रार प्राप्त होताच लागणार ‘चेक मीटर’…

उद्रेक न्युज वृत्त :-आता ज्या ठिकाणी स्मार्ट मीटरबाबत तक्रार प्राप्त होईल,तेथे तात्काळ समांतर चेक मीटर बसविणे आवश्यक राहील.त्याचा संपूर्ण खर्च संबंधित स्मार्ट मीटर बसविणाऱ्या...

मार्गावर गाय आडवी आल्याने दुचाकी चालकाचा अपघाती मृत्यू; पत्नी आणि मुले बचावली..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-आपल्या स्वगावाहून पत्नी आणि दोन पाच वर्षांच्या मुलांसह दुचाकीने निघालेल्या दुचाकी चालकाचा नागपूर जिल्ह्याच्या खुर्सापार नजीकच्या मार्गावर अचानक गाय आडवी आल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!