Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता स्मार्ट मीटरची तक्रार प्राप्त होताच लागणार 'चेक मीटर'...

आता स्मार्ट मीटरची तक्रार प्राप्त होताच लागणार ‘चेक मीटर’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आता ज्या ठिकाणी स्मार्ट मीटरबाबत तक्रार प्राप्त होईल,तेथे तात्काळ समांतर चेक मीटर बसविणे आवश्यक राहील.त्याचा संपूर्ण खर्च संबंधित स्मार्ट मीटर बसविणाऱ्या एजन्सीने उचलायचा आहे. किमान तीन महिने चेक मीटर कार्यरत ठेवावे लागेल.दर महिन्याला स्मार्ट मीटर आणि चेक मीटरच्या रीडिंगची तुलना केली जाईल.त्यात तफावत आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल,असे केंद्र सरकारने वीज वितरण कंपन्यांना निर्देश दिलेत.विशेष म्हणजे, स्मार्ट मीटरवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील वीज वितरण कंपन्यांना पत्र पाठवून स्मार्ट मीटरवर देखरेख ठेवण्यासाठी किमान ५ टक्के ‘चेक मीटर’ समांतरपणे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर महावितरणने २२ जुलै रोजी मीटर बसविणाऱ्या एजन्सींना ५ टक्के चेक मीटर बसविण्याची मोहीम १५ दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजने(आरडीएसएस)अंतर्गत राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.आतापर्यंत राज्यात १ कोटी २५ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.त्यापैकी नागपूर जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडळात मिळून चार लाख चेक मीटर बसविण्यात आल्याने या बाबतीत सदरचा विभाग राज्यात आघाडीवर आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!