Tuesday, September 8, 2026
Homeनागपूरमार्गावर गाय आडवी आल्याने दुचाकी चालकाचा अपघाती मृत्यू; पत्नी आणि मुले बचावली..

मार्गावर गाय आडवी आल्याने दुचाकी चालकाचा अपघाती मृत्यू; पत्नी आणि मुले बचावली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आपल्या स्वगावाहून पत्नी आणि दोन पाच वर्षांच्या मुलांसह दुचाकीने निघालेल्या दुचाकी चालकाचा नागपूर जिल्ह्याच्या खुर्सापार नजीकच्या मार्गावर अचानक गाय आडवी आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून घडलेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला,तर दुचाकीवरील पत्नी आणि दोन्ही चिमुकले सुदैवाने बचावली.प्रवीण रामकृष्ण गिऱ्हाडे वय ३७ वर्षे,रा. नारा,ता.कारंजा,जि.वर्धा असे मृतकाचे नाव आहे.
माहितीनुसार,कारंजा तालुक्याच्या नारा येथील प्रवीण  गिऱ्हाडे हे काल बुधवारी पत्नी व पाच वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा यांना सोबत घेऊन एमएच ३२ एवाय ३०७७ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूरकडे
जाण्यासाठी निघाले होते.दरम्यान,नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार जवळ येताच अचानक एक गाय रस्त्यावर आडवी आली,ज्यामुळे प्रवीण गिऱ्हाडे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात घडला.यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती नारा गावात पोहचताच आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. प्रवीण गिऱ्हाडे यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,मुलगी व मुलगा पाच वर्षाचा असून पार्थिवावर मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.झालेल्या अकस्मात मृत्यूने नारा गावावर शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!