Tuesday, June 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची? घरगुती गॅस सिलिंडरच्या सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.गत अवघ्या सहा महिन्यांत सिलिंडरच्या दरात तब्बल दोनशे रुपयांची वाढ झाली असून,आता विनाअनुदानित सिलिंडरचा भाव एक हजार रुपयांच्या पार गेला आहे.महिन्याला हजार रुपये फक्त गॅसवर गेले तर दूध,भाजीपाला,औषध यासाठी पैसे कुठून आणायचे?असा सवाल नागरिक करत आहेत.परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, ग्रामीण भागात पुन्हा एकदा सरपण आणि लाकडे गोळा करणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे.घरगुती सिलिंडर सोबतच व्यावसायिक सिलिंडरचे दरही गगनाला भिडले आहेत.त्यामुळे हॉटेल, चहाच्या टपऱ्या आणि लहान खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.आधीच तेल महाग,त्यात आता गॅसही महाग झाला.अशा परिस्थितीत आम्ही धंदा कसा करायचा आणि ग्राहकांना कोणत्या दराने खाद्य पदार्थ विकायचे?अशी हतबलता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.केंद्र सरकारने गरिबांना धूरमुक्त आयुष्य देण्यासाठी ‘उज्ज्वला योजना’ आणली.परंतु,सिलिंडर रिफिल करण्याची ऐपत नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे सिलिंडर आज घराच्या कोपऱ्यात धूळखात पडले आहेत.या वाढत्या महागाईवर सरकारने लवकरात-लवकर नियंत्रण आणावे,अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे....

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा,विज्ञान व कला क्षेत्रात करणार मॅपिंग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या क्रीडा,विज्ञान तसेच कला व संस्कृती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!