- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-शासकीय कामांसाठी गोर-गरीब जनता ते सर्वसामान्य नागरिकांना कितीतरी दिवस शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.कित्तेक विभागातील अधिकारी,कर्मचारी ‘उद्या या..दहा दिवसांनी या..’ असे म्हणून हेलपाटे मारायला लावतात व नागरिकांची कामे प्रलंबित ठेऊन अनेकांना त्रास देण्याचे काम करीत असतात. अश्यातच गोर-गरीब जनता तथा सर्वसामान्य नागरिकांच्या विविध शासकीय विभागांशी संबंधित अडीअडचणी,समस्या तथा प्रश्नांची सोडवणूक एकाच व्यासपीठावर,वेळेत व प्रभावी पद्धतीने व्हावे, यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी सर्व विभागांची झडती घेण्यासाठी देसाईगंज नगरीच्या नगरपरिषद सांस्कृतिक भवनात येत्या,सोमवार १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजे पासून ते निराकरण होईपर्यंत ‘जनता दरबार’ आयोजित केलेला आहे.सदर जनता दरबारात कृषी विभाग,महावितरण,महसूल विभाग (तलाठी,मंडळ अधिकारी,सर्व सरपंच ग्रामपंचायत व पंचायत समिती (ग्रामसेवक) पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,अन्न व नागरी पुरवठा विभाग,पोलीस विभाग,वन विभाग,भूमी अभिलेख विभाग(आखीव पत्रिका संबंधित) व इतर संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.जनता दरबारात आमदार मसराम हे आमने-सामने थेट संवाद व समस्यांवर तात्काळ निराकरण करणार असल्याने देसाईगंज शहरापासून ते तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या तक्रारी तथा गाऱ्हाणी घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

