Saturday, October 17, 2026
Homeदेसाईगंजनैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज,मंगळवार १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून सकाळच्या सुमारास भीम जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंचशील बौद्ध समाज नैनपूरच्या सभासदांनी शाळेत उपस्थित दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी भूषवले.तर कार्यक्रमाचे प्रभावी संचालन शिक्षक मंगेश तुपट यांनी केले.तर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन शिक्षिका तृषाली सुखदेव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक ईश्वर गहाणे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका अपर्णा जडे,प्राची खरकाटे व प्रियंका तलमले यांनी विशेष परिश्रम घेतले.या प्रसंगी मुख्याध्यापक तिघरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शिक्षण,समानता व सामाजिक न्याय यांचे महत्त्व पटवून दिले.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही उत्साहाने भाषणे सादर करून आपल्या विचारांची मांडणी केली.पंचशील बौद्ध समाज, नैनपूर येथील प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले व शाळेला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला असून,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा सर्वांना मिळाली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!