Monday, August 17, 2026
Homeदेसाईगंजछत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ बागेश्वर बाबाला चपलेचा प्रसाद.....

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ बागेश्वर बाबाला चपलेचा प्रसाद.. – आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कमिटी आक्रमक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज,मंगळवार २८ एप्रिल रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कमिटीच्या वतीने देसाईगंज-ब्रम्हपुरी मुख्य मार्गावर आंदोलन पुकारण्यात आला.दरम्यान,उपस्थित आंदोलनकर्त्यांनी धिरेंद्र शास्त्रीच्या फोटोला चपलेचा प्रसाद देत मुर्दाबादचे नारे लावून भोंदू बाबा विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी,तसेच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलनादरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राचे  आमदार रामदास मसराम यांनी धिरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की,छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.अशा प्रकारांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः धिरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस,नितीन गडकरी व मोहन भागवत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी,असे स्पष्ट करून जाहीर निषेध नोंदवला.तर उपस्थित पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी निषेध नारे लावून बागेश्वर धाम बाबाला जोडे मारले.
आज झालेल्या आंदोलन प्रसंगी माजी सभापती परसराम टिकले,हिराभाई मोटवानी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जिवन पाटील नाट,देसाईगंज काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी उपसभापती नितीन राऊत,जयंत हरडे,आरती लहरी,नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान,धनपाल मिसार,माजी सभापती गिरीधर तितराम,मनोहर निमजे, विलास बनसोड,कमलेश बारस्कर,देसाईगंज युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष अमर भर्रे,नगरसेवक शाम उइके नगरसेविका मंदा समर्थ,नगरसेविका गुरमीतकौर चावला,नगरसेविका आशाताई दहिवले,प्रकाश समर्थ, अरुण कुंभरवार,दुर्वास नाईक,हिरामण कुळमिथे, टीकाराम नीमकर,प्रमोद पत्रे,नंदू चावला,वैष्णवी आकरे, श्रीराम मोहूर्ले,हिरालाल बुराडे,हरिदास बगमारे,वैभव मेश्राम,शैलेश दुपारे,हिरालाल दोनाडकर,श्रावण राऊत,पुंडलिक पर्वते,प्रशांत अंकमवार,दिनेश मोहूर्ले, प्रमोद मेश्राम,पितांबर देशकर,गोपाल बोरकर, वैभव कुर्जेकर,सचिन राऊत,तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवप्रेमी आंदोलनात सहभागी झाले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!