Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीसेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना नागरिकांना पारदर्शक,वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ..

सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना नागरिकांना पारदर्शक,वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सेवा हक्क दिनानिमित्त आज,मंगळवार २८ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक,वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपस्थितांना शपथ देत सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता,वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी सांगितले की, शासनाच्या विविध सेवा निर्धारित कालमर्यादेत पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे.सेवांमध्ये कोणताही विलंब,अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे.प्रामाणिकपणा,निःस्वार्थी वृत्ती आणि संवेदनशीलता या मूल्यांच्या आधारे काम केल्यास नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले.यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवांमध्ये पारदर्शकता राखणे,वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे तसेच लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला.या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!