Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगावातील संबंध बिघडण्याच्या भीतीने अंगणवाडी सेविकांची लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यास असमर्थता.. -...

गावातील संबंध बिघडण्याच्या भीतीने अंगणवाडी सेविकांची लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यास असमर्थता.. – लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी राहणार ‘जैसे थे’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ‘लाडो’ ठरली.विशेष म्हणजे,लोकसभा निवडणुकीत धक्का लागताच गेम चेंजर म्हणून लाडकी बहीण योजना आणल्या गेल्याचे सुर उमटले आणि ते खरे ठरले.लाडकी बहीण योजना सुरू होताच योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ६३ लाख लाख महिलांची नोंदणी झाली होती.प्राथमिक पडताळणीत १० ते १५ लाख अर्जदार अपात्र ठरले होते.त्यानंतर वेगवेगळ्या विभागांकडून त्यांच्याकडील लाभार्थ्यांची माहिती माविण्यात आली.यात तब्बल २६ लाख लाभार्थी महिलांना अन्य योजनांचा लाभ मिळत असल्याचे स्पष्ट झाले.त्यानुसार काही महिला पहिल्याच पडताळणीत बाद ठरल्या.आता पडताळणीसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याद्या पाठविण्यात आल्या आहेत.यादीतील नावांची चौकशी करून पडताळणीचे काम हे त्या-त्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे सोपविण्यात येणार आहे. त्यातच गावातील संबंध बिघडू शकतात.कारण की, गावातील एखाद्या महिलेस योजनेचा लाभ न मिळाल्यास तुम्हीच आमचा लाभ बंद केल्या,अशी मनधारणा होत असल्याने संबंध बिघडण्याच्या भीतीने अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींच्या पडताळणीचे काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या फेरपडताळणीवरून राज्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.पण, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही फेरपडताळणी सुरू असली तरी पात्र लाभार्थी महिलांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली आहे.शासकीय सेवेत असतांनाही या योजनेचा लाभ घेतला जात असेल तर शासन त्याविषयी योग्य तो निर्णय घेईल.या प्रकरणी कुणालाही चुकीचा लाभ मिळू नये,यासाठी सरकार योग्य ती पाऊले उचलत आहे.त्यामुळे सर्वांनी अंगणवाडी सेविकांना पडताळणीसाठी सहकार्य करावे,असेही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!