Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंज“गोकुळात नांदो आनंद".. नैनपूर शाळेत कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा..!

“गोकुळात नांदो आनंद”.. नैनपूर शाळेत कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वार्ड देसाईगंज येथे आज,शनिवार १६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या भक्तीभावात व उत्साहाने साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख  अंबाजी आमनार यांच्या हस्ते संपन्न झाले,तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र मातेरे विराजमान होते.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मेश्राम,सदस्य उमाकांत कवासे,गजानन कवासे,विनोद नखाते,रामप्रसाद लुटे,हरी राऊत यांचे सह गावातील नागरिक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील माऊली भजनी मंडळाने गोपालकाला,भजन,कीर्तन सादर करून शाळेत भक्तिमय वातावरण निर्माण केले.त्यानंतर वर्ग १ व २ च्या विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधाच्या गणवेशामध्ये फॅशन शो सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.यानंतर वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण व गोपिकेचा सुंदर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांचे मन मोहून टाकले.कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला दहीहंडी उत्सव.वर्ग ४ व ५ च्या विद्यार्थ्यांनी “गोविंदा रे गोपाळा” म्हणत विविध ग्रुप तयार करून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. गावातील प्रतिष्ठित नागरिक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक व मुख्याध्यापकांनीही आपले पथक तयार करून उत्साहाने दहीहंडी फोडली.यानंतर मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना आपल्या संस्कृतीतील परंपरा, त्यामागील शास्त्रीय विचार आणि विज्ञानाशी असलेला संबंध यावर सखोल व सोप्या भाषेत मोलाचे विवेचन केले.शेवटी भक्तीमय संगीताच्या तालावर विद्यार्थी,शिक्षक आणि ग्रामस्थांनी भक्तिभावाने नृत्य सादर केले.महापूजनाने या भव्यदिव्य कार्यक्रमाची सांगता झाली.प्रसंगी शाळेतील शिक्षक ईश्वर गहाणे,मंगेश तुपट,तृषाली सुखदेवे,अपर्णा जडे,प्रियंका तलमले, प्राची खरकाटे तसेच मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचा सहभाग नोंदविला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!