Tuesday, August 18, 2026
Homeदेसाईगंजदिव्यांगांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करुन एकाच छताखाली विविध शासकिय योजनांचा लाभ...

दिव्यांगांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करुन एकाच छताखाली विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा.. -देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या उद्देशाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना १५ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली.स्वतंत्र विभाग स्थापन केल्यामुळे दिव्यांग विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व केंद्रित प्रशासन अधिक सक्षम झाले आहे.हे विभाग दिव्यांग व्यक्तींकरीता शिक्षण,रोजगार, कौशल्य विकास,सामाजिक सुरक्षा,सहाय्यक साधने व उपकरणे तसेच आर्थिक सहाय्य संबंधित केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करतो. तसेच,दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम,२०१६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहून,सुलभता व समान संधींचा प्रसार करतो आणि इतर विभागांशी समन्वय साधून दिव्यांग व्यक्तींसाठी समावेशक व शाश्वत विकास सुनिश्चित करतो.दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग कल्याण विभागामार्फत विकसित करण्यात आलेले एक एकात्मिक डिजिटल व्यासपीठ असून, दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा व लाभांचा एकाच ठिकाणी(Single Window)लाभ मिळावा या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
या पोर्टलचा मुख्य उद्देश समावेशकता,समान संधी व डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे.या माध्यमातून योजना अर्ज,अर्जच्या स्थितीची तपासणी, तक्रार निवारण व संबंधित माहिती सहज उपलब्ध करून दिली जाते.प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे,विभागीय समन्वय बळकट करणे आणि प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शासनाच्या सेवांचा अखंड व सुलभ लाभ मिळावा यासाठी हे पोर्टल कार्यरत आहे.नगर परिषद क्षेत्रातील कायम दिव्यांग असलेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी या पोर्टलवर नोंदणी करुन दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व अधिक माहितीकरीता नगर परिषदेच्या दिव्यांग विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी केले आहे .
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!