Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचक्क पोलीस उपअधीक्षकाने आंदोलन कर्त्याच्या कंबरेत मारली लाथ; कारवाईची मागणी..

चक्क पोलीस उपअधीक्षकाने आंदोलन कर्त्याच्या कंबरेत मारली लाथ; कारवाईची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा होत असतांनाच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात अनेकांनी आंदोलन,आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासन अलर्ट असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडले नाहीत.अश्यातच आज,शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यात सदरक्षणाय म्हणजे लोकांचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी समज घालण्याऐवजी चक्क आंदोलन कर्त्याच्या कमरेत उडून लाथ मारल्याची घटना उघडकीस आल्याने त्या पोलीस उपअधीक्षकावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांकडून घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे.
आज सकाळच्या सुमारास भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात पार पाडल्या गेला. अश्यातच जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात पत्नीने परस्पर दुसरे लग्न केल्याच्या आरोपावरून व कौटुंबिक वादातून दाखल गुन्ह्याबाबत आंदोलक अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.पोलिस आरोपींना पाठिशी घालून फिर्यादींना त्रास देत असल्याचा त्यांचा आरोप आहे.आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात गेल्या होत्या.पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी त्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला,परंतु पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना यश आले नाही.त्यातच आंदोलन कर्त्याला पकडुन नेत असतांनाच पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी मागून धावत येत आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली.आंदोलन कर्त्याला लाथ मारल्याने समाज माध्यमांवर घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.प्रकरणी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांचेवर कारवाईची मागणी केली जात आहे.
व्हायरल व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!