Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरगिटार शिकवणी वर्ग चालकाचा अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार..! -पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

गिटार शिकवणी वर्ग चालकाचा अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार..! -पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रॉकस्टार अकॅडमी नावाने गिटारचे शिकवणी वर्ग चालविणाऱ्या एका २७ वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.आरोपी इतक्यावरच थांबला नाही,तर बंदुकीचा धाक दाखवून तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत सातत्याने अत्याचार केले.त्रास असह्य झाल्याने मुलीने कुटुंबीयांना आपबिती सांगितली.त्यानुसार कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.सागर सिंग परोसिया ऊर्फ सॅमसंग वय २७ वर्षे, सिव्हिल लाइन्स असे आरोपीचे नाव आहे.तो उज्ज्वलनगर येथील सनशाइन अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर रॉकस्टार अकॅडमी नावाने गिटारचे क्लासेस चालवितो.
पीडित अल्पवयीन मुलीने गिटार शिकण्यासाठी जून महिन्यात रॉकस्टार अकॅडमीत क्लास लावला. सुरुवातीला आरोपी सागरने अल्पवयीन मुलीशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला.त्यानुसार तो चांगला वागू लागला.मात्र,त्यानंतर एके दिवशी त्याने तिला क्लासच्या कोपऱ्यात नेले व तिच्याशी अश्लील चाळे करत घाणेरडे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सदरची बाब खटकल्याने मुलीने तिथेच गिटार सोडली व ती क्लासमधून निघून गेली.२३ जुलै रोजी आरोपी सागरने तिला फोन केला व दहा मिनिटांत भेटायला आली नाही तर घरच्यांना मारून टाकेन,अशी धमकी दिली.घाबरलेली मुलगी क्लासमध्ये गेली असता आरोपीने त्याच्याजवळील बंदूक व चाकूच्या धाकावर तिच्यावर अत्याचार केला.त्यानंतर त्याने वारंवार तिला जिवे मारण्याची भीती दाखवत क्लासच्या फ्लॅटवर बोलविले व अत्याचार केला.२३ जुलै ते १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रकार सुरू होता.त्याने यादरम्यान अनेकदा तिच्या आईवडिलांना बंदुकीने ठार मारेन, अशी तिला धमकी दिली.मात्र त्याचा त्रास असह्य झाल्याने अखेर मुलीने कुटुंबीयांना आपबिती सांगितल्याने पालकांनी तिला सोनेगाव पोलिस ठाण्यात घेऊन जात तिथे तिच्या तक्रारीवरून आरोपी सागरविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!