उद्रेक न्युज वृत्त :-उत्पादन क्षेत्रात १८ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग यांना पाठिंबा देणे,मेक इन इंडियाला प्रोत्साहन,उद्योगांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये समाविष्ट करणे,तसेच सामाजिक सुरक्षा सेवांचा विस्तार करणे (पेन्शन,विमा),यासाठी आज,शुक्रवार ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशातील तरुणांना एक खास भेट देत पंतप्रधान विकास भारत योजनेची घोषणा केली आहे. सदरची योजना आज,शुक्रवार १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू केली जात आहे.याअंतर्गत,खाजगी क्षेत्रात पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून १५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळेल.फ्रेशर्सना म्हणजेच पहिल्यांदा नोकरी देणाऱ्या कंपन्यांना सरकार प्रति कर्मचारी ३ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन मिळेल.यासाठी ९९ हजार ४४६ कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे.याअंतर्गत दोन वर्षात साडे तीन कोटी नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
तरुणांसाठी पंतप्रधानांकडून मोठी घोषणा.. पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना मिळेल १५ हजार रुपयांची आर्थिक मदत..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

