Wednesday, June 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर(अहमदनगर)येथे पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.तर चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदी आयुष नोपानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नोपानी हे सध्या जालना येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.विशेष म्हणजे, नोपानी यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून आपली सेवा बजावली आहे.
  • विद्यमान पद व बदलीनंतरचे ठिकाण👇
अजय के.बन्सल : पोलीस अधीक्षक,जालना यांची बदली पोलीस अधीक्षक,सायबर सुरक्षा महाराष्ट्र राज्य.
सिगुरी विशाल आनंद : पोलीस अधीक्षक, अमरावती(ग्रामीण) यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक, बुलढाणा
बाळासाहेब पाटील : पोलीस अधीक्षक,नाशिक (ग्रामीण) यांची नियुक्ती पोलीस उप आयुक्त,मुंबई शहर
सोमनाथ घागे : पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांची नियुक्ती सहायक पोलीस महानिरीक्षक(पोलीस महासंचालक कार्यालय
रविंद्रसिंह एस.परदेशी : पोलीस अधीक्षक,परभणी यांची नियुक्ती उपआयुक्त,राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
संदीप घुगे : उपआयुक्त,राज्य गुप्तवार्ता विभाग,मुंबई यांची नियुक्ती पोलीस उप आयुक्त,मुंबई शहर
श्रवण दत्त : पोलीस अधीक्षक,नंदुरबार यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक (विशेष कृती)
मुम्मका सुदर्शन : पोलीस अधीक्षक,चंद्रपूर यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक,अहील्यानगर(अहमदनगर)
धोंडोपंत एस.स्वामी : पोलीस अधीक्षक,ठाणे (ग्रामीण) यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक,नाशिक (ग्रामीण)
अनुज मिलिंद तारे : पोलीस अधीक्षक,वाशीम यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक,अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स,पुणे
अनुराग जैन : पोलीस अधीक्षक,नागरी हक्क संरक्षण यांची नियुक्ती पोलीस उपआयुक्त,मुंबई शहर
अधिनी सानप : पोलीस अधीक्षक,लोहमार्ग पुणे यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक,नंदुरबार
तवजीर सिंह संधू : अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक,जालना
राजकुमार शिंदे : पोलीस उप आयुक्त,पुणे शहर यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक,लोहमार्ग पुणे
निकेश खाटमोडे : पोलीस अधीक्षक,अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स,पुणे यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक,वाशीम
आयुष नोपाणी : अप्पर पोलीस अधीक्षक,जालना यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक,चंद्रपूर
पंकज कुमावत : अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती(ग्रामीण) यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक, परभणी
निकेतन कदम : पोलीस उप आयुक्त,परिमंडळ-५, नागपूर यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक, अमरावती(ग्रामीण)
सुरज गुंजाळ : अप्पर पोलीस अधीक्षक,परभणी यांची नियुक्ती अप्पर पोलीस अधीक्षक,मालेगाव
गजानन राजमाने : पोलीस अधीक्षक,फोर्स वन यांची नियुक्ती पोलीस उप आयुक्त,मुंबई शहर
दत्ता लक्ष्मण टोपले : अप्पर पोलीस महासंचालक (विशेष कृती),महाराष्ट्र राज्य यांचे स्टाफ ऑफिसर यांची नियुक्ती अप्पर पोलीस अधीक्षक,अमरावती
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एमडी ड्रग्स पावडर,घातक शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पोलीस गस्तीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी  काही संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेताच मोठा भांडाफोड होऊन कारवाईत एमडी(मेफेड्रोन)पावडर, घातक शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेले सोन्या-चांदीचे...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १८ जून...

डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे चार हजार रुपये द्यायला सांगताच एसीबीची धाड; दोघेजण अडकले जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन मालमत्तांच्या रजीस्ट्रीचे चार हजार रुपये लागतील,असे सांगून ते पैसे डाटा एन्ट्री ऑपरेटरकडे...

अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला येणार पीएम किसानचे दोन हजार खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २३ वा हप्ता हा येत्या,शनिवार २० जून २०२६ रोजी वितरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!