Friday, May 1, 2026
Homeमुंबईआज राज्याच्या विविध ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न.. -कुणी गावातील अतिक्रमण काढण्यासाठी तर कुणी...

आज राज्याच्या विविध ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न.. -कुणी गावातील अतिक्रमण काढण्यासाठी तर कुणी बिल,जमिनीचे वाद व इतर कारणांसाठी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात पार पडत असतांनाच राज्याच्या विविध ठिकाणांतील अन्यायग्रस्तांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना आज,शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी घडल्यात.यात गावातील अतिक्रमण काढण्यापासून ते जमिनीचे वाद,कंत्राटदारांचे थकीत बिल यासह विविध न्याय मागण्या संदर्भात  आत्मदहनाचा अनेकांकडून प्रयत्न केला गेला. मात्र,यंत्रणांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. राज्यातील सोलापूर,इंदापूर,वर्धा,बुलढाणा,धुळे आणि मंत्रालयासमोर सकाळच्या सुमारास घटना घडल्या.
वर्ध्यात कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांचे देयक थकले असून,वारंवार निवेदन देऊनही कार्यकारी अभियंता अंभोरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे संतप्त कंत्राटदार बाबा जाकीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आत्महदहनाचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखले. पीएम विश्वकर्मा योजनेसह शासनाकडून करण्यात आलेल्या कामांचा निधी जिल्ह्याला मिळाल्यानंतरही बिल काढण्यासाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप आहे.बुलढाणा जिल्ह्याच्या आंधरुड येथील शेवंताबाई बनसोडे या महिलेने ध्वजारोहणापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.मात्र,सतर्क असलेल्या पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला, गावातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची या महिलेची मागणी होती.सोलापूरात स्वांतत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणाने आत्मदहनाचा केला प्रयत्न केला.गौरव पवार असे या तरुणाचे नाव असून, तो सोलापूर शहरातील विणकर सोसायटी येथील रहिवाशी आहे.अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटून घेत,आत्मदहनाचा प्रयत्न करत असलेल्या तरुणाला सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आत्मदहनाचे कारण अद्याप समजले नसून तरुणाला ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.इंदापुरात जमिनीच्या वादावरून स्वातंत्र्यदिनी युवतीने आत्मदानाचा प्रयत्न केला. इंदापूरमधील प्रशासकीय भवनाच्या आवारातच ध्वजावंदन सुरू असताना पूजा शिंदे नावाच्या युवतीने अंगावरती पेट्रोलसदृश्य पदार्थ ओतून घेत आत्मदानाचा प्रयत्न केला.यादरम्यान इंदापूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.गेल्या दोन दिवसांपासून जमिनीच्या वादाच्या प्रकरणावरून पूजा शिंदे या युवतीने आपल्या कुटुंबावर अन्याय होत असून,धनदांडगे ही जमीन लुटत आहेत,असा आरोप केला होता आणि स्वातंत्र्यदिनी आपण आत्मदहन करू,असा इशारा प्रशासनाला दिला होता.त्यानंतर आज इंदापूर मधील प्रशासकीय भवनांच्या परिसरात तिने ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!