Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियाचार वाहनांना धडक देत तब्बल २० विद्यार्थ्यांना चिरडणार इतक्यात..मोठा अनर्थ टळला..!

चार वाहनांना धडक देत तब्बल २० विद्यार्थ्यांना चिरडणार इतक्यात..मोठा अनर्थ टळला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या सालेकसा शहरातील बसस्थानकावर चित्तथरारक घटना समोर आली आहे.सरळ मार्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने धाडधाड करत रस्त्याच्या बाजूला असलेल्या चार वाहनांना धडक देत तब्बल २० विद्यार्थ्यांना चिरडणार इतक्यात प्रसंगावधान राखत विद्यार्थी साईडला झाल्याने थोडक्यात बचावले. अश्यातही ट्रक पुढे सरकत रस्ता दुभाजकावर जाऊन थांबला.यात जीवितहानी टळून मोठा अपघात होता होता अनेकजण बचावल्याची घटना काल गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.
विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. विद्यार्थ्यांनी सालेकसा बसस्थानक गाठले.यावेळी सुमारे २० विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत रस्त्याच्या कडेला उभे होते.त्याचप्रकारे चाकरमाने तसेच व्यापारी आणि शेतकरीदेखील गोंदिया आणि आमगावला जाण्यासाठी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उभे होते.अशातच दर्रेकसाच्या दिशेने आमगावकडे जाणारा एमएच-४० वाय-५५९७ क्रमांकाचा ट्रक भरधाव आला.त्या ट्रकने धाडधाड तब्बल चार वाहनांना धडक दिली.त्यानंतर चक्क उभे असलेले विद्यार्थी आणि प्रवाशांच्या दिशेने ट्रक गेला. परिस्थितीचे भान राखूत विद्यार्थी आणि प्रवासी तेथून पळाले.त्यामुळे त्यांचा जीव वाचला.ट्रकचालकाचा थरार एवढ्यावरच थांबला नाही,तर चालकाने ट्रक चक्क रस्ता दुभाजकावर चढविला.सुमारे १० मीटरपर्यंत ट्रक दुभाजकावरून चालत होते.हा सर्व प्रकार पाहून तेथे उपस्थित नागरिकांनी त्या ट्रकचालकाला थांबवून चांगलाच चोप दिला. पोलिसांना माहिती मिळताच चालकाला ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!