Friday, June 19, 2026
Homeदेसाईगंजशहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. - देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष महत्व प्राप्त झाल्याने नव्याने विवाह झालेल्या मुलीच्या नावात बदल करण्यासाठी विवाह नोंद प्रमाणपत्रावर क्यूआर कोडची आवश्यकता आहे.मात्र, शहरी भागातील विवाह नोंद प्रमाणपत्रांवर अद्याप क्यूआर कोड देण्यात आलेले नसल्याने नव्याने विवाह झालेल्या मुलींना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची गरज लक्षात घेता देसाईगंज येथील
भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतेच गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आशिष वानखेडे यांना ग्रामीण भागात जसे क्युआर कोड असलेले विवाह प्रमाणपत्र दिले जातात,अश्याच प्रकारे शहरी भागातील विवाह नोंद प्रमाणपत्रांवरही क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्रे देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
विवाह झालेल्या मुलीच्या नावात बदल करण्यासाठी विवाह नोंद प्रमाणपत्रावरील क्यूआर कोडची आवश्यकता आहे,असे आधार केंद्र चालकांचे म्हणणे आहे.परंतु,शहरी भागात विवाह नोंद प्रमाणपत्रावर अद्याप क्यूआर कोड देण्यात आलेला नाही.त्यामुळे विवाह झालेल्या नवीन मुलींना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.जसे की,नावात बदल करणे,नवीन बँक खाते उघडणे,मतदान ओळखपत्र तयार करणे तसेच शासकीय योजनांचा लाभ घेणे इत्यादी कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.ग्रामीण भागात मात्र हेच प्रमाणपत्र क्युआर कोडसह देण्यात येत आहेत.त्यामुळे त्यांचे आधारकार्डवरील नाव,पत्ता व इतर बाबींमध्ये सहजरित्या बदल होत आहे.परंतु शहरातील लाभार्थींना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे शहरी भागातही सदर सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.करीता या बाबीची दखल घेऊन शहरी भागातील विवाह नोंद प्रमाणपत्रांवर क्यूआर कोडची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी,अशा प्रकारचे निवेदन आशिष वानखेडे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी गडचिरोली यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.निवेदन सादर करतेवेळी गडचिरोली जिल्हा सचिव सचिन वानखेडे,देसाईगंज नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती तथा भाजपाचे शहराध्यक्ष सचिन खरकाटे,युवा नेते अब्रार शेख, आशिष खरकटे यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान; खत, बियाणे महागले..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांची जिकडून-तिकडून पिळवणूक सुरू आहे.पावसाळ्याचे महिने सुरू होऊनही कित्येक दिवसांपासून पाऊस पडण्याचे नावाच घेत नाहीये.अश्यातच आभाळाकडे आशेने नजरा लावून बसलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!