- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-आरटीओ वाहनाच्या धडकेत ३ वर्षाय बालक ठार झाल्याची घटना काल,मंगळवारी ९ ऑक्टोंबरच्या सायंकाळी ७ च्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खरबी नाका येथील वंजारी राईस मिल समोर घडली.पूर्वांश रामकृष्ण वंजारी वय ३ वर्षे रा.खरबी नाका, ता.जि.भंडारा असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे.
जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका ट्रकमध्ये रेती ओव्हरलोड असल्याचा संशयावरून ट्रकला वजन काटा करण्यासाठी खरबी येथील राईस मिल वर घेऊन जात होते.भंडारा आरटीओ विभागाचे चारचाकी स्कॉर्पिओ क्रमांक-एमएच ०४ केआर ६४३६ चे वाहन पुढे जात होते.राईस मिलच्या समोरच रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या पूर्वांश रामकृष्ण वंजारी याला धडक लागली.धडकेत तो रस्त्याचा कडेला पडल्याने गंभीर दुखापत झाली.उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.सदरच्या घटनेने नागरिकांनी रोष व्यक्त केला.जवाहर नगर पोलिसांनी भंडारा परिवहन विभागाच्या आरटीओ वाहन चालक काशीद मिर्झा याचेवर भारतीय न्याय संहिता कलम १०६,२८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम राठोड सह पोलीस कर्मचारी संदीप बंबावले करीत आहेत.
- Advertisement -

