Wednesday, September 9, 2026
Homeभंडारादुचाकीचे संतुलन बिघडल्याने खाली कोसळला; तितक्यातच बस आली अन् अनर्थ घडला.. -...

दुचाकीचे संतुलन बिघडल्याने खाली कोसळला; तितक्यातच बस आली अन् अनर्थ घडला.. – तरुणाचा जागीच मृत्यू; तर महिला गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दुचाकीने स्वगावी जाण्यासाठी निघालेल्या तरुणाचा वाटेतच रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार १ जून रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी-तुमसर राज्य मार्गावर घडली.दुचाकीने मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळून जात असतांना मागून आलेल्या एका अज्ञात भरधाव दुचाकीस्वाराने दुचाकीला कट मारला. यामुळे दुचाकीचे संतुलन बिघडले.तितक्यातच समोरून बस आली आणि अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.आकाश प्रकाश कटबर्ये वय २६ वर्षे, रा.हरदोली(झं),ता.मोहाडी,जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे; तर दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिता मनोज कुर्वे वय ४० वर्षे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आकाश कटबर्ये व त्याची मामी अनिता कुर्वे हे दोघेही  एमएच ३६ एझेड ०६२८ क्रमांकाच्या दुचाकीने कौटुंबिक वादाची तक्रार नोंदवण्यासाठी मोहाडी पोलिस ठाण्यात गेले होते.तेथील प्रक्रिया पार पाडून हरदोलीला परत जात असतांनाच मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ एका अज्ञात भरधाव दुचाकीस्वाराने आकाशच्या दुचाकीला कट मारला. यामुळे दुचाकीचे संतुलन बिघडून अनिता कुर्वे रस्त्याच्या एका बाजूला फेकल्या गेल्या,तर आकाश हा समोरून येणाऱ्या एमएच ०६ बी डब्ल्यू १४३ क्रमांकाच्या हिरकणी बसच्या चाकाखाली आला.सदरची बस तुमसरहून नागपूरला जात होती.अपघात इतका भीषण होता की,आकाशचा जागीच मृत्यू झाला.घटनेच्या वेळी तिथून जाणाऱ्या पोलीस जीपचे चालक पृथ्वीराज राठोड यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने जखमी आकाश आणि अनिताला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तपासणीनंतर डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले,तर डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अनिता कुर्वे यांना पुढील उपचारांसाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी दुर्योधन भुरे,लांजेवार, कल्पना फड आणि ज्योत्स्ना बनसुरे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमाव नियंत्रित करून परिस्थिती नियंत्रणात आणली.घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!