- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-क्षुल्लक कारणावरून कोण-कधी,काय करेल याचा नेम नाही.रागाच्या भरात मारझोड करतांना आपण अनेकदा बघितले आहे.अशातच राग अनावर झाल्यास समोरील व्यक्ती कोण आहे? हे मागेपुढे ही बघितले जात नाही.असाच प्रकार भंडारा तालुक्यात उघडकीस आला आहे.सदर प्रकरण असे की,माझ्या मुलाला शाळेत कामावर ठेवा,अशी मागणी करीत वाद घालून पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकीनीने चक्क मुख्याध्यापिकेच्या कानशिलात लगावली असल्याची घटना ठाणा पेट्रोलपंप येथील मानवता प्राथमिक शाळेत उघडकीस आला आहे.याप्रकरणी मुख्याध्यापिका कल्याणी सचिन निखाडे-तिरपुडे वय ४० वर्षे,रा.विवेकानंद कॉलनी,ठाणा यांच्या तक्रारीवरून हेमलता अनिल मालाधरे वय ५० वर्षे हिच्यावर जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.हेमलता मालाधरे ही मानवता प्राथमिक शाळेत स्वयंपाकी बाई म्हणून काम करते. माझ्या मुलाला शाळेत कामावर ठेवा,असा हेका तीने गेल्या २ महिन्यांपासून मख्याध्यापिकेकडे धरत वाद घालणे सरू केले होते.याप्रकरणी त्यांनी शाळा व्यवस्थापनाला माहिती दिली.शालेय व्यवस्थापन समितीची सभा घेऊन या सभेत स्वयंपाकी बाईला शाळेतून काढण्याचा ठराव पारीत करण्यात आला.या प्रकरणावरून चिडलेल्या हेमलता मालाधरे हिने शिवीगाळ करून मुख्याध्यापिकेच्या कानशिलात लगावली; असे तक्रारीत नमूद केले आहे.या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.सदर प्रकरण अदखलपात्र स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात दाद मागण्याची समज दिली.
कल्याणी निखाडे (तिरपुडे) या जिल्हा भाजप महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव असून,मानवता प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका आहेत. स्वयंपाकी हेमलता मालाधरे यांची नणंद ममता भोंडे ही राजकारणात सक्रिय असल्यावरून मुख्याध्यापिका त्रास द्यायची.नेहमीप्रमाणे शाळेत कर्तव्यावर गेली असता,रजिष्टरमध्ये स्वाक्षरी करण्यास मज्जाव करून
स्वयंपाकी या पदावरून काढल्याचे सांगून शिवीगाळ करून थापडबुक्यानी मारहाण केली,असे हेमलता मालाधरे यांनी पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.
- Advertisement -

