Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरखर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. - मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता “मरणारे मरोत आणि आमचे पोट भरोत” असे अनेकजण पैश्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळ करू लागलेत.त्यामुळे खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..अशी म्हणण्याची वेळ आली आहे.अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यात एका नकली तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड झाला आहे.या प्रकरणी एलसीबी पथक,सावली पोलीस प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्तरित्या कारवाई करून मशीनच्या सहाय्याने बनावट तंबाखूची निर्मिती व विक्री करणाऱ्या केंद्रावर धाड मारून तब्बल ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.विजय भीमाजी भांडेकर वय ३२ वर्षे,रा.सामदा बु.,ता.सावली, जि.चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव असून प्रकरणी आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता(बीएनएस)अंतर्गत विविध कलमान्वये सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी होला व इगल ब्रँडचा तंबाखू,खुला सुगंधित तंबाखू,पॅकिंग साहित्य, उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री(मशीन) तसेच एमएच-३४-सीजे-९६२५ क्रमांकाचा एक चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त केला.सदरची कारवाई ही सावली तालुक्याच्या रयतवारी येथे करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने तंबाखू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल गडचिरोली येथील एका इसमाकडून खरेदी केल्याची कबुली दिली.जप्त साहित्यावरून मोठ्या प्रमाणात बनावट तंबाखूचे उत्पादन करून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी,सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार पोलीस स्टेशन सावली तसेच अन्न व अन्न सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे नेतृत्वा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रेटवार,सपोनि बलराम झाडोकर,पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर,पोउपनि सर्वेश बेलसरे,स.फौ.धनराज करकडे,पोहवा गणेश भोयर, पोहवा चेतन गज्जलवार,पोहवा संतोष येलपुलवार,पोहवा जयसिंग,चापोहवा दिनेश आराडे,पोलीस अंमलदार सुमित बर्डे,पो.अं.प्रफुल गारघाटे,चापोअं मिलिंद टेकाम, ऋषभ बारसिंगे यांचेसह अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!