- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध कर्ज व अनुदान योजनांचा लाभ दिला जात आहे.सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्यास एकूण ६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून,इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळामार्फत अनुदान,बीजभांडवल,थेट कर्ज, एनएसएफडीसी मुदत कर्ज आणि एनएसएफडीसी सूक्ष्मपतपुरवठा या योजनांद्वारे सवलतीच्या व्याजदरात कर्ज व अनुदान उपलब्ध करून दिले जाते.या योजनांद्वारे लघुउद्योग,व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
इच्छुक लाभार्थ्यांनी mahadisha.mpbcdc.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत.अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एलआयसी रोड,गडचिरोली येथे अथवा दूरध्वनी क्रमांक ०७१३२-२२२०१० वर संपर्क साधावा,असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
- Advertisement -

