- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात.ऋतुजा सचिन कुकडे वय १६ वर्षे,रा.हनुमान नगर,बिरसा मुंडा चौक,राजुरा, ता.राजुरा,जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती.विशेष म्हणजे,ऋतुजाचे वडील आणि आई हे शासकीय नोकरीवर असून वडील तलाठी,तर आई पोलिस विभागात कार्यरत आहे.कुकडे कुटूंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला येथील रहिवासी आहेत.
सध्या हे कुटुंब राजुरा शहराच्या हनुमान नगर,बिरसा मुंडा चौक परिसरात वास्तव्यास असून घटनेच्या दिवशी म्हणजेच काल शनिवारी दुपारच्या सुमारास आई-वडील घरी नसतांना ऋतुजाने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटना घडली त्यावेळेस तिचा आठ वर्षाचा लहान भाऊ घरीच होता.त्यानेच सर्वप्रथम घटनेची माहिती घरमालकाला दिली.त्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले.माहिती मिळताच राजुरा पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.विद्यार्थिनीला खाली उतरवून त्वरित शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.विद्यार्थिनीच्या वडिलांची राजुरा तहसील कार्यालयात तलाठी म्हणून नियुक्ती असून तिची आई राजुरा पोलीस विभागात कार्यरत आहे.शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या पालकांच्या कुटुंबात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.ऋतुजाच्या आत्महत्येचे नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

