Wednesday, July 29, 2026
Homeभंडारावैनगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू; पाच जण थोडक्यात बचावले..

वैनगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू; पाच जण थोडक्यात बचावले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज 
भंडारा :-जिल्ह्याच्या करचखेडा येथील वैनगंगा नदी बेटावर एका खासगी बोटीद्वारे आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सात तरुणांपैकी परतीच्या वाटेवर असतांना नदीतील पाण्यात बोट उलटल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी रात्री घडली. कृष्णा जगन्नाथ बोकडे वय २६ वर्षे,रा.चांदणी चौक,भंडारा व पवन मुरली चौबे वय ३४ वर्षे,रा.आंबेडकर वार्ड,भंडारा अशी मृतक तरुणांची नावे असून यापैकी कृष्णा बोकडे याचा मृतदेह आज,सोमवार ८ जून रोजी सकाळी अकरा वाजता शोध मोहिमेदरम्यान सापडला असून दुसऱ्याचा शोध घेणे सुरू आहे.
भंडारा तालुक्यातील करचखेडा येथील वैनगंगा नदीपात्रात काल रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता सात तरुण नदीतील एका बेटावर आंघोळ करण्यासाठी गेले होते.यात पवन मुरली चौबे वय ३४ वर्षे,रा.आंबेडकर वार्ड,भंडारा,कृष्णा जगन्नाथ बोकडे वय २६ वर्षे,रा.चांदणी चौक,भंडारा,सुबोध विलास ढोक वय २६ वर्षे,रा.सेद्री बुजुर्ग,ता.पवनी,जि.भंडारा, अर्जुन मोतीराम मेश्राम वय २९ वर्षे,सध्या रा.आंबेडकर वार्ड,भंडारा,काशीनाथ फत्तू मेश्राम वय ३२ वर्षे,रा.जुना करचखेडा,ता.जि.भंडारा, आकाश केवट वय २७ वर्षे,रा.आंबेडकर वार्ड,भंडारा व मृणाल बाळकृष्ण मंदुकर वय २० वर्षे,रा.गांधी चौक, भंडारा हे सातही तरुण सायंकाळी आंघोळ करून बोटीने परत निघाले असता वैनगंगा नदीच्या मध्यभागी येताच अचानक बोट उलटली.यात कृष्णा बोकडे व पवन चौबे हे दोघेही नदीच्या पाण्यात बुडाले.तर सोबत असलेले पाच तरुण पोहत-पोहत नदी तीरावर पोहचून थोडक्यात बचावले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने जिल्हा शोध व बचाव पथकाला घटनास्थळी तात्काळ रवाना करून नदीत बुडालेल्या दोन्ही तरुणांचा शोध घेण्यास युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान,आज सकाळी एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध घेणे सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!