Tuesday, July 21, 2026
Homeभंडाराअल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या २२ वर्षीय तरुणास अटक..

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या २२ वर्षीय तरुणास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला फुस लावून पळवून नेणाऱ्या २२ वर्षीय तरुणास लाखांदूर पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे.मनिष भारत बोदेले वय २२ वर्षे,रा.भागडी,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याला आज,शुक्रवार ५ जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार  दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मागील मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात १७ वर्षीय अल्पवयीन पीडितेच्या आईने लाखांदूर पोलीस ठाणे गाठून अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती.याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक-२७२/२०२६ भारतीय न्याय संहितेचे कलम १३७(२)अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.दरम्यान,तांत्रिक तपासाच्या आधारे पीडितेसह आरोपीचा शोध सुरू असतांनाच संशयित आरोपी मनिष बोदेले हा मुलीला घेऊन नागपूर शहरातील कळमना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.लाखांदूर पोलिसांनी तातडीने नागपूर गाठले व आरोपी आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन लाखांदूर येथे आणले.येथे आणल्यानंतर अल्पवयीन मुलीची लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे या प्रकरणात पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी या गुन्ह्यात कलम ६४,२(आय)बीएनएस तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत कलम चार व सहाची वाढ केली.
आरोपीला न्यायालयात हजार केले असता आरोपी मनिष बोदेले याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरीश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!