Tuesday, September 8, 2026
Homeभंडाराअन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची औषधे उत्पादित करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू लागलेत.अश्याच प्रकारे गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन औषध प्रतिष्ठानांवर भंडारा शहरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.सदरची कारवाई औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन,भंडारा यांच्या पथकाने बुधवार ३ जून २०२६ रोजी केली असून कारवाईत २९ हजार ७९२ रुपये किंमतीचा आक्षेपार्ह औषध साठा जप्त करण्यात आला आहे. ‘औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिरात)कायदा,१९५४’ चे उल्लंघन केल्याप्रकरणी सदरची कारवाई करण्यात आली आहे.
भंडारा शहरातील राम मंदिर रोड,बडा बाजार येथील
मे.श्री लक्ष्मी आयुर्वेद औषधालय आणि राजीव गांधी चौक येथील पतंजली चिकित्सालय व औषधी भंडार स्टोअर्स(मे.अविशा इंटरप्राईजेस)या दोन प्रतिष्ठानांवर छापा टाकण्यात आला.तपासणीदरम्यान,विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण १५ औषधांवर आक्षेपार्ह मजकूर आणि जाहिरात आढळून आली.पहिल्या प्रतिष्ठानातून १२ हजार १८० रुपयांचा,तर दुसऱ्या पतंजली प्रतिष्ठानातून १७ हजार ६१२ रुपयांचा औषध साठा कायदेशीर पंचनामा करून जप्त करण्यात आला.जप्त करण्यात आलेल्या औषधांच्या वेष्टनावर मधुमेह,हृदयरोग,लठ्ठपणा,नेत्ररोग,गलगंड,महिला व पुरुषांमधील लैंगिक समस्या आणि वजन कमी करणे यांसारख्या गंभीर आजारांवर त्वरित गुण येईल,असा मजकूर छापण्यात आला होता.जप्त केलेल्या औषधांमध्ये पतंजलीचे कारेला जामुन ज्यूस,दृष्टी आय ड्रॉप्स,आय ग्रीट आय ड्रॉप्स,हृदयम्रीत वटी,कांचनार घनवटी यांसह शक्तीपुंज टॅबलेट्स,श्वेत प्रदरान्तक कॅप्सूल आणि सुंदरी सुधा सिरप यांसारख्या १५ औषधांचा समावेश आहे.
  • श्रीमती शहनाज ताजी,सहाय्यक आयुक्त(औषधे),अन्न व औषध प्रशासन भंडारा👇
आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाच्या औषध उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.जनतेच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही.
  •  नागरिकांना आवाहन👇
कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करू नये.औषधांच्या दर्जाबाबत वा आक्षेपार्ह जाहिरातीबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!