Tuesday, July 21, 2026
Homeनागपूरअल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.विशेष म्हणजे,दोघांनी गोदाम फोडले व तेथून ११ लाख ३९ हजाराचा माल लंपास केला.पोलिसांच्या तपासात दोघांच्या कृत्याचा भंडाफोड होताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
राहुल जयचंद बत्रा वय ४५ वर्षे,जुनी बगडगंज,बत्रा हाऊस यांचे चिखलीतील दालमिल मार्गावर राहुल सिरॅमिक प्रा.लि.नावाचे टाइल्स सॅनिटरी अँड सीपी फिटिंग सामानाचे गोदाम आहे.२७ मे ते २८ मेदरम्यान अज्ञात चोरट्याने गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावरील टिन वाकवून आत प्रवेश केला.आरोपीने गोदामातील कृषी वापराचे ११.३९ लाखांचे साहित्य लंपास केले.हा प्रकार लक्षात आल्यावर बत्रा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.गुन्ह्याच्या तपासासाठी उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांनी विशेष तपास पथक गठित केले होते.पोलिसांनी जवळपास ३५ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.त्यांना त्यांच्या प्रेयसींना आयफोन खरेदी करायचा होता. त्यासाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी गोदामातील माल लंपास केला.त्यांनी काही माल इरफान अली उर्फ इम्मू रमजान अली वय ३८ वर्षे,फुटकनगर, कुंदनलाल गुप्तानगर यांना विकला.पोलिसांनी या प्रकरणात इरफान अली याला अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे,करीम खान पठाण,संतोषकुमार रामलोड,रवीकुमार शाहू,प्रदीप पवार,मंगेश लोही,संतोष पांडे,अनिल जाधव,प्रफुल गोहोकर यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!