- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-राज्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याची प्रमुख कारणे ही वेगवेगळी असू शकतात.मात्र, सध्या स्थितीत १५ ते १८ वयोगटातील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे.विशेषतः काहीजण प्रेमाच्या आमिषाला बळी पडतात,तर काहीजण घरचे रागावल्याने,गरिबी,नैराश्य व इतर कारणांमुळे बेपत्ता होत असल्याचे चित्र आहे.अश्यातच गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुलगी व तिच्या मामाचा मुलगा गावात नाट्य प्रयोगाचे कार्यक्रम असल्याने ते पाहण्यासाठी गेले होते. मात्र,त्याच रात्रीपासून मुलगी बेपत्ता झाल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.सदरचा प्रकार हा आरमोरी तालुक्याच्या रामपूर येथे गुरुवार ४ डिसेंबर रोजी घडला असून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आजी-आजोबांकडे महिनाभरापासून वास्तव्यास होती. गुरुवार ४ डिसेंबर रोजी रामपूर गावात नाटकाचे सादरीकरण असल्याने अल्पवयीन मुलगी व मामाचा मुलगा दोघेही नाटक पाहायला गेले होते.रात्री १.१० वाजता ती नाटकातून बाहेर पडतांना दिसली; त्यानंतर मात्र ती कुठेही आढळून न आल्याने मामाच्या मुलाने सदरची माहिती घरी जाऊन दिली.कुटूंबीय तसेच नातलगांनी शोध घेतला असता तिचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने अखेर कुटुंबीयांनी आरमोरी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.त्यानुसार,पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोहुर्ले करीत आहेत.
- Advertisement -

