Tuesday, September 22, 2026
Homeभंडारापती-पत्नी मध्ये सतत व्हायचे भांडण; समुपदेशन केंद्रावर येताच घडले भयानक- भंडारा जिल्ह्यातील...

पती-पत्नी मध्ये सतत व्हायचे भांडण; समुपदेशन केंद्रावर येताच घडले भयानक- भंडारा जिल्ह्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- समुपदेशन केंद्रावर चर्चा करण्यासाठी आलेल्या पत्नीवर पतीने चक्क ब्लेडने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.पत्नीने पतीसोबत त्याच्या घरी जाण्यास नकाराने दिल्याने पतीने हे भयंकर कृत्य केले.सदर घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ग्राम खांबा जांभळी येथील अश्विनकुमार मेश्राम आणि त्याची पत्नी टिकेश्वरी २२ वर्षे या दोघा पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता.अनेकदा भांडण विकोपाला जायचे. यामुळे पत्नीने या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली होती.याप्रकरणी दोघांना चर्चा करण्यासाठी अभय समुपदेशन केंद्र,साकोली येथे बोलवण्यात आले होते.

सुनावणीदरम्यान पती अश्विन हा पत्नी टिकेश्वरीला घरी नेण्यासाठी तयार होता.मात्र,पत्नीने जाण्यास नकार दिला.यामुळे वाद वाढला आणि रागाच्या भरात अश्विनने टिकेश्वरीच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केला.यात पत्नी गंभीर जखमी झाली.तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून,पुढील उपचार सुरू आहेत.पती अश्विन मेश्राम याला पोलिसांनी अटक करून कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!