Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी,जुनी वडसा येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या....- देसाईगंज तालुक्यातील घटना

मोठी बातमी,जुनी वडसा येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या….- देसाईगंज तालुक्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 देसाईगंज :- नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जुनी वडसायेथील प्रथमेश ईश्वर पत्रे वय १५ वर्षे युवकाने आज ४ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास घरातीलच बेडरुममधे गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रथमेश पत्रे १० व्या वर्गात शिक्षण घेत असून घरी कुणीही नव्हते.आई- वडील बाहेर कामासाठी गेले होते व लहान बहीण ८ व्या वर्गात शिक्षण घेत असून शाळेतून घरी पोहचल्या नंतर प्रथमेश पत्रे हा घरातीलच बेडरुममधे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याने बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली.लगेच गावातील माजी नगरसेवक सचिन खरकाटे यांनी देसाईगंज पोलीस विभागाला सदर घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात सदर युवकाचे शव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे कळते.गळफास घेण्याचे कारण अद्यापही कळलेले नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस विभाग करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!