- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-पूर्वी एखाद्याकडेच महागडा अँड्रॉइड मोबाईल फोन असायचा.मात्र,सध्या स्थितीत गरिबातला-गरीब जरी असला तरीही त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन दिसून येतो.काही नागरिक सोडता जवळपास ९९ टक्के लोकं जिकडे पाहावे तिकडे मोबाईल वरती काही ना काही तरी पाहत असतातच. त्यातच आजची तरुणाई व्हॉट्सॲप,फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट,मॅसेंजर व विविध नाना तऱ्हेचे सोशल मीडियावर चॅटिंग करून दिवसभर मनोरंजन करीत असतात. अशातच चॅटिंग करता-करता एखाद्या जोडप्यांचे सुत जुळून येतात,तर एखादा त्यात अडकून पडतो व जेलची हवा खात असतो.असाच काहीसा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यात उघडकीस आला आहे.आधी फेसबुकवर मैत्री अन् नंतर अत्याचार केल्याप्रकरणी प्रकरणी पोलीस कोठडी.
फेसबुकवर एका अल्पवयीन मुलीची एका अनोळखी तरुणाशी मैत्री झाली.मैत्रीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याची खळबळजनक घटना काल, रविवारी ३ नोव्हेंबरला येथे उघडकीस आली. सुजित कैलास गेडाम वय २२ वर्षे,रा.मोहाडी ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर,असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,पीडित १७ वर्षीय मुलीसोबत सुजित गेडामची पाच महिन्यांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली.त्यानंतर दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले.यातून दोघांत प्रेम बहरले.दरम्यान,ऑक्टोंबर च्या शेवटच्या आठवड्यात सुजितने मुलीला आपल्या गावी भेटण्यास बोलावले.त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान,नंतर ती गावी परतली.तिने याबाबत कुटुंबीयास सांगितल्यावर आरमोरी ठाण्यात भारतीय न्याय संहिता ६४(१), ६४ (२) (i), ६४(२) (२)८७, १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.आरमोरी पोलिसांनी ३१ ऑक्टोंबरला आरोपीस त्याच्या गावातून ताब्यात घेतले.त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

