- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे हरीओम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जोरदार चपराक बसली असून आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ९५ हजार ३०२ रुपये ९ टक्के व्याजासह परत करा; असा आदेश पतसंस्थेला दिला.
हे व्याज ११ जुलै २०१८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे.ही रक्कम देण्यासाठी पतसंस्थेला ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.त्यानंतर या रकमेवर १२ टक्के व्याज लागू होईल,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.याशिवाय,तक्रारकर्त्याला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाईदेखील मंजूर करण्यात आली आहे.ही रक्कम पतसंस्थेनेच द्यायची आहे.
राजकुमार चोपकर,असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते नागपूरच्या नंदनवन येथील रहिवासी आहेत. त्यांना आयोगाचे मिलिंद चोपकर,अध्यक्ष सतीश सप्रे व सदस्य केदार यांनी हा दिलासा दिला.यांनी या पतसंस्थेत बचत खाते सुरू केले होते.त्यामध्ये मोठी जमा झाल्यानंतर ते मुदत ठेव रक्कम करीत होते. दरम्यान,त्यांनी परिपक्व झालेल्या मुदत ठेवीची रक्कम मागितली असता पतसंस्थेने टाळाटाळ केली. तसेच,मुदत ठेवमधील रक्कम त्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बचत खात्यात वळती केली.११ जुलै २०१८ पर्यंत या खात्यामध्ये ३ लाख ९५ हजार ३०२ रुपये जमा झाले होते.ती रक्कम त्यांना परत देण्यात आली नाही.तसेच,पतसंस्थेने कायदेशीर नोटीसलाही प्रतिसाद दिला नाही.परिणामी,चोपकर यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.पतसंस्थेने सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे तक्रारकर्त्यास त्याची हक्काची रक्कम मिळाली नाही व तो रकमेच्या उपभोगापासून वंचित राहिला.करिता,तक्रारकर्ता दंडात्मक व्याजासह रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच,पतसंस्थेने तक्रारकर्त्याला त्याची कायदेशीर रक्कम थकवून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यासाठी तक्रारकर्ता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यासही पात्र आहे; असे निरीक्षण आयोगाने निर्णयात नोंदविले.
- Advertisement -

