- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज,सोमवार ४ नोव्हेंबर आहे.आज निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम उमेदवार कोण? याचे चित्र स्पष्ट होईल.त्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल.त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने उद्या ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहेत.या कालावधीत दोनच रविवार मिळणार आहेत.त्यामुळे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
सर्वपक्षीय उमेदवार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले आहेत.या माध्यमातून प्रचार केला जात आहे.आदर्श आचारसंहिता लागू असून उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना सोशल मीडियावर प्रचार करताना आयोगाने घातलेल्या अटी,शर्थीचे पालन करणे बंधनकारक आहे.ऐन दिवाळीत विधानसभा निवडणूक आली आहे.त्यामुळे दिवाळीत प्रचार थंडावला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजता संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटपसुद्धा यावेळी केले जाईल.त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने ५ नोव्हेंबरपासूनच सुरू होणार आहे. निवडणुकीसाठीं येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबरला संपणार आहे.प्रचार कालावधीत सुटीचा रविवार हा महत्त्वाचा असतो.या कालावधीत केवळ १० नोव्हेंबर १७ नोव्हेंबर हे दोनच रविवार आले आहेत.निवडणुकीत रविवार हा खऱ्या अर्थाने प्रचाराचा वार असतो.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळणार आल्याने कालावधीत विधानसभा मतदारसंघातील मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.त्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे.प्रचार रॅली आणि नेत्यांच्या जाहीर सभा कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक करावे लागणार आहे.
- Advertisement -

