Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगरीत आमदार मसरामांचे 'जनता दरबार'.. - सर्व विभागांची होणार झडती; नागरिकांनी...

देसाईगंज नगरीत आमदार मसरामांचे ‘जनता दरबार’.. – सर्व विभागांची होणार झडती; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शासकीय कामांसाठी गोर-गरीब जनता ते सर्वसामान्य नागरिकांना कितीतरी दिवस शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.कित्तेक विभागातील अधिकारी,कर्मचारी ‘उद्या या..दहा दिवसांनी या..’ असे म्हणून हेलपाटे मारायला लावतात व नागरिकांची कामे प्रलंबित ठेऊन अनेकांना त्रास देण्याचे काम करीत असतात. अश्यातच गोर-गरीब जनता तथा सर्वसामान्य नागरिकांच्या विविध शासकीय विभागांशी संबंधित अडीअडचणी,समस्या तथा प्रश्नांची सोडवणूक एकाच व्यासपीठावर,वेळेत व प्रभावी पद्धतीने व्हावे, यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी सर्व विभागांची झडती घेण्यासाठी देसाईगंज नगरीच्या नगरपरिषद सांस्कृतिक भवनात येत्या,सोमवार १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजे पासून ते निराकरण होईपर्यंत ‘जनता दरबार’ आयोजित केलेला आहे.सदर जनता दरबारात कृषी विभाग,महावितरण,महसूल विभाग (तलाठी,मंडळ अधिकारी,सर्व सरपंच ग्रामपंचायत व पंचायत समिती (ग्रामसेवक) पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,अन्न व नागरी पुरवठा विभाग,पोलीस विभाग,वन विभाग,भूमी अभिलेख विभाग(आखीव पत्रिका संबंधित) व इतर संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.जनता दरबारात आमदार मसराम हे आमने-सामने थेट संवाद व समस्यांवर तात्काळ निराकरण करणार असल्याने देसाईगंज शहरापासून ते तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या तक्रारी तथा गाऱ्हाणी घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!